शारीरिक संबंधांवेळी एक्सएल बुली कुत्र्याचा मालकावर प्राणघातक हल्ला, प्रकरण कोर्टात गेलं आणि

मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (19:10 IST)
प्रणयक्रिडा सुरू असताना अमेरिकन एक्सएल बुली जातीच्या कुत्र्याने चक्क मालकावरच हल्ला केला आणि हे प्रकरण थेट कोर्टात गेलं.हँक नावाच्या या दोन वर्षांच्या कुत्र्याला 2 ऑगस्ट रोजी स्कॉट थर्स्टन (वय वर्षे 32) यांच्या ग्लॅनमन, कारमार्थेनशायर इथल्या घरी ठेवण्यात आलं होतं.
 
दंडाधिकारी लॅनेली यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत असं सांगण्यात आलं की, थर्स्टन यांची जोडीदार लीन बेल यांनी पहाटे पोलिसांना फोन करून जोन्स टेरेस येथे बोलवून घेतलं.
 
पोलिस अधिका-यांच्या बॉडीकॅम फुटेजमध्ये ते घटनास्थळी दाखल झाल्याचं दिसत असून मिस्टर थर्स्टन बागेत कुत्र्यावर ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता.
 
कुत्र्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी संभाव्य अपीलाचा प्रतिक्षा कालावधी लक्षात घेता पुढील 28 दिवस ही कारवाई करता येणार नाही.
मिस बेल दोन पोलिस अधिकाऱ्यांना असं सांगत होत्या की, "मला चार मुलं आहेत. मला कुत्रा आवडतो, परंतु मी त्याला माझ्या मुलांच्या आसपास ठेवू शकत नाही."
 
कोर्टाच्या सुनावणीत असंही सांगण्यात आलं की, मिस बेल आणि मिस्टर थर्स्टन प्रणयापूर्वी एकमेकांशी वाद घालत होते आणि जेव्हा त्यांनी सेक्स करायला सुरूवात केली तेव्हा कुत्र्याने मिस्टर थर्स्टन यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा चावा घेतला.
 
कुत्र्याने मिस्टर थर्स्टन यांच्या डाव्या हाताचा आणि हनुवटीचा चावा घेतला होता, परंतु त्यांनी रुग्णवाहिका वापरण्यास नकार दिला.
 
शेवटी कुत्र्याला घराच्या खालच्या मजल्यावरील खोलीत ठेवण्यात आलं.
 
त्यानंतर पोलिसांनी 19 ऑगस्ट रोजी कुत्र्याला ताब्यात घेतलं आणि त्याला डायफेड पॉविस पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आलं.
 
श्वान कायदा 1871 च्या कलम 2 नुसार कुत्रा धोकादायक असल्याच्या आधारावर त्याला ठार करण्याच्या आदेशाची पोलिस वाट पाहत होते.
 
पोलिसांतर्फे फ्रेडरिक लेव्हेंडन यांनी न्यायालयात सांगितलं की, “ही घटना प्रत्यक्षात अधिक गंभीर असण्याची शक्यता आहे."
 
डाइफेड पॉविस पोलिसांसाठीही या कुत्र्याचे संरक्षण ही अतिशय चिंतेची बाब होती.
 
मिस्टर थर्स्टन यांना झालेली दुखापत गंभीर नसली तरी भविष्यात हा कुत्रा त्यांना गंभीररित्या जखमी करू शकतो किंवा लहान मुलांपैकी कोणाला तरी तो दुखापत करू शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला.
 
मिस्टर थर्स्टन यांची बाजू मांडणारे इयान बर्च यांनी म्हटलं की, यापूर्वी अशा घटना घडलेल्या नसल्यामुळे योग्य काळजी घेऊन कुत्रा घरी पाठवला जाऊ शकतो.
 
घरातील चार लहान मुलांचा विचार करता कुत्र्यापासूनच्या सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन दंडाधिकार्‍यांनी कुत्र्याला ठार करण्याचे आदेश दिले.
 
त्यांनी म्हटलं की, कुत्र्याला माघारी पाठवणे सुरक्षित ठरणार नाही.
 
त्यांनी 800 पौंडांचा दंडदेखील ठोठावला.
 
कोर्टातून बाहेर पडताना मिस्टर थर्स्टन आणि त्यांची जोडीदार लीन बेल यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
 
Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती