तंत्रज्ञान कंपनी एमआयचा दावा आहे की या मास्कमुळे धूळ आणि धुळीमध्ये लपलेल्या लहान कणांपासून ९९ टक्क्यांपर्यंत बचाव करता येणार आहे. या प्रदूषणरोधक मास्कमध्ये ४ थर (लेयर) लावण्यात आले आहेत. मास्कच्या मदतीने हवेत मिसळणारे धूलीकण रोखून शुद्ध हवा मिळवता येईल. तसेच श्वास घेतानादेखील त्रास होणार नाही. कंपनीच्या माहितीनुसार मास्क अगदी मऊ आणि आरामदायक आहे. गरज नसल्यास याची रुमालासारखी घडी करुन ठेवता येईल. हवा शुद्ध करणाऱ्या मास्कचे चीनमध्ये २०१६ला अनावरण करण्यात आले होते. यात हायफायबर टेक्स्टाइलचा वापर करण्यात आला होता.