त्र्यंबकेश्‍वर मंदिर कधी खुले होणार? ट्रस्टने दिली “ही”तारीख व वेळ

शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (07:42 IST)
त्र्यंबकेश्‍वर  :- श्री त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीसाठी मंदिर दि. 5 ते 12 जानेवारीदरम्यान दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यामुळे उद्या दि. 13 रोजी सकाळी 7 वाजेपासून मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे.
 
गेल्या आठवडाभरात भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत शिवलिंगावर वज्रलेप लावण्यात आला. गर्भगृहास चांदीचे दरवाजे बसविण्यात आले. हे दरवाजे औरंगाबादचे उद्योजक शेखर देसर्डा यांनी त्र्यंबकेश्‍वरचरणी अर्पण केले आहेत. मंदिराच्या सभामंडपात असलेला हर्ष महाल दर्शनासाठी दररोज उघडा ठेवण्यात येणार आहे.
 
या हर्ष महालाचे नूतनीकरण करण्यात आले असून, तो यापूर्वी भाविकांना वर्षातून तीन वेळाच पाहता येत होता. दर्शनरांगेत बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग काढून त्या ठिकाणी स्टेनलेस स्टीलच्या रेलिंग्ज बसविण्यात आल्या आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती