कुलभूषण यांचा व्हिडियो प्रसिद्ध झाला

मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (09:42 IST)
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांनी आज(दि.25) त्यांची आई आणि पत्नीची भेट घेतली आहे.  त्यांची भेट जवळपास  दीड वर्षांनंतर त्यांची कुटुंबीयांसोबत भेट घेतली आहे.  इस्लामाबादस्थित पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात जवळपास 40 मिनिटं ही भेट झाली आहे. या प्रकरणात  पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार केली होती.  कुलभूषण जाधव हे काचेच्या एका बाजूला बसले होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. 
 
 कुलभूषण जाधव यांची आई  व पत्नी लगेचच व्यावसायिक विमानाने भारताकडे परत आल्या आहेत. हेरगिरी आणि  दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली आहे.
 

या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने  पत्रकार परिषद घेऊन भेटीनंतरचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.  यामध्ये कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. ते म्हणतात की  आई व  पत्नीला भेटू द्यावं अशी विनंती मी पाकिस्तानच्या सरकारकारला केली होती तेव्हा त्यांनी माझी ही विनंती मान्य केली त्यासाठी  मी पाकिस्तान सरकारचे आभार मानतो आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती