लंडनमध्ये भर चौकात मानवी मास विक्रीला

लंडन- लंडनच्या ट्रायफेल्गर स्क्वेअरला सर्व लंडनकर आपल्या कामात व्यस्त होते, तेव्हा अचानक गर्दीची नजर लोकांमध्ये माणसाचे मास विकणार्‍यांवर गेली. रस्त्याच्या मधोमध रक्ताने माखलेल्या प्लास्टीकखाली मुलींचे शव दिसत होते, या शवाचे मास खरेदी करण्याचे आवाहन काही लोक करत होते.
 
लंडनच्या रस्त्यावर बिकनी घातलेल्या मुली रस्त्यावर पडलेल्या होत्या, रक्ताने शरीर माखलेल्या या मुली प्लास्टिकने झाकलेल्या होत्या, एखादे शव झाकल्यासारखे. हे दृश्य पाहून लोकं हैराण होत होते. मुलींच्या शरीरावर मानवी मटण असल्याचे लेबल लावण्यात आले होते. खरे तर हे लोक स्पेसिएसिस्मचा विरोध करत होते, काही मुलींनी जमिनीवर पडून प्रदर्शन केले.स्पेसिएसिस्म म्हणजे प्राण्यांचे जीवनही अनमोल आहे, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले, तसेच जनावरांनाही जगण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. लोकांना त्यांनी शाकाहारी होण्याचे आवाहन केले, कारण मटणासाठी प्राण्यांचे जीव घेतला जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती