पाकला रशियन हेलिकॉप्टर मात्र युद्धासाठी नाही

मंगळवार, 25 जुलै 2017 (11:19 IST)

आपला शेजारी आणि दहशतवादी असलेल्या पाकीस्थानला रशियाने मदत केली आहे. यामध्ये रशियाकडून पाकिस्तानला एमआय-१७१ ई हेलिकॉप्टर देण्यात येणार आहे. मात्र हे हेलिकॉप्टर  युद्ध करण्यसाठी नाहीत. तर ते मुख्यतः  प्रवासी, मालवाहू आणि वैद्यकीय वाहतूक करण्यासाठी  आहे. या नवीन हेलिकॉप्टरच्या मदतीने २७ प्रवासी आणि ४ टनांपर्यंत वजन वाहून नेता यणार आहे. तर एखादी घटना घडली आणि वैद्यकीय मदत लागली तर  १४ स्ट्रेचर्सच्या सहाय्याने यातून रुग्णांना घेऊन जाणे शक्य होणार  आहे. या संदर्भात रशियाने सरकारशी करार केला आहे. पाकचा अशांत असलेल्या बलुचिस्तान प्रांतात वापरले जाणार आहे. यंदाच्या वर्षभरात हे दुसरे हेलिकॉप्टर रशिया पाकिस्तानला देणार आहे. त्यामुळे पाकमधील स्थिती किती गंभीर आहे हे दिसून येथे. रशियाने हा करार मागच्या वर्षी केला होता. भारता प्रमाणे आम्हाला ही मिग द्या अशी मागणी पाकने केली होती मात्र त्याची कोणतीही दखल रशिया अथवा अमेरिकने घेतली नाही. उलट आता अमेरिकेने पाकची सर्व मदत थांबवली आहे.

वेबदुनिया वर वाचा