मोदी यांनी सांगितले की, भारताला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. 5 हजार वर्ष जुनी शास्त्रं आमच्याकडे उपलब्ध आहेत, जे वेद या नावानं ओळखले जातात. यातील एक वेद म्हणजे अथर्ववेद जे पूर्णतः निसर्गाला समर्पित आहे. आम्ही त्या आदर्शांना पुढे घेऊन जात आहोत. निसर्गाचं शोषण करणं आम्ही गुन्हा मानतो. आम्ही निसर्गाचं शोषण स्वीकारत नाही. यासाठी आम्ही आमच्या ''उत्पादन क्षेत्रात शून्य दोष, शून्य परिणाम'' या तत्त्वावर चालतो.