अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारावर भारतासह रशिया आणि चीनवर निशाणा साधला आहे. पेन्सिल्वेनियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत ट्रम्प म्हणाले, पॅरिस करारासाठी अमेरिका ट्रिलियन डॉलर खर्च करत आहे. मात्र रशिया, चीन आणि भारतासारखे प्रदूषण करणारे देश काहीच देत नाही आहेत. येत्या दोन आठवड्यात पॅरिस करारावर मोठा निर्णय घेणार असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. रॅलीमध्ये त्यांनी जागतिक पर्यावरणाच्या मुद्द्यावर झालेल्या या क्लायमेट डीलला एकतर्फी सांगितलं आहे.
या कराराअंतर्गत पैसे भरण्यासाठी अमेरिकेला वेगळ्या पद्धतीनं लक्ष्य करण्यात येत आहे. खरं तर प्रदूषण पसरवणारे रशिया, चीन आणि भारतासारखे मोठे देश काहीच योगदान देत नाहीत. ट्रम्प म्हणाले, येत्या दोन आठवड्यांत पॅरिस करारावर मोठा निर्णय घेणार आहोत. पॅरिस करार हा एकतर्फी आहे. त्यामुळे अमेरिकेला अरबो डॉलरचं नुकसान सोसावं लागतंय. मात्र प्रदूषण करणा-या रशिया, चीन आणि भारताचं यात कोणतंही योगदान नाही. जलवायू परिवर्तन डोळ्यांसमोर ठेवून 2015मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पारंपरिक रूपरेषेंतर्गत 194 देशांनी करारावर स्वाक्षरी केली होती. यातील 143 देशांनी या कराराचं जोरदार समर्थनही केलं आहे.
जलवायू तापमान कमी करण्याचा या कराराचा मुख्य उद्देश आहे. पॅरिस कराराचं पालन करताना अमेरिकेच्या जीडीपीला येत्या 10 वर्षांत 2.5 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 1606 अरब रुपयांहून जास्तीचं नुकसान सोसावं लागू शकते. त्यामुळे येत्या काळात अमेरिकेतील कारखाने आणि प्लांट्स बंद होतील, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकन मीडियाला गद्दार असं संबोधत मीडिया हा रिपोर्ट दाखवणार नसल्याचंही सांगितलं आहे.