'या' बँकेने हजारो खात्यांमध्ये चुकून 1300 कोटी रुपये पाठवले

शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (19:28 IST)
आपल्या खात्यात अचानक पैसे  बँकच्या चुकीमुळे आल्यावर आपल्याला आश्चर्याच्या धक्काच बसणार .पण असं क्वचितच होऊ शकते. पण हा प्रकार ब्रिटनमध्ये घडला आहे, जिथे  सॅंटेंडर(Santander) बँकेने हा मोठा गोंधळ घातला आहे. बँकेच्याच 2 हजार खात्यांमधून बँकेने 75 हजार लोकांना रक्कम पाठवली. आता पाठवलेले पैसे परत कसे मिळवायचे, अशी डोकेदुखी बँकेसमोर आहे.  
25 डिसेंबर रोजी सॅंटेंडर बँकेच्या बाजूने हा घोळ झाला होता. विशेष बाब म्हणजे सँटेंडरचा हा पैसा बार्कलेज, एचएसबीसी, नॅटवेस्ट, को-ऑपरेटिव्ह बँक आणि व्हर्जिन मनी या प्रतिस्पर्धी बँकांच्या खातेदारांकडे गेला. सॅंटेंडरसाठी आव्हान आहे की ही बँक खातेदारांकडून पैसे कसे परत मिळवते? बँके कडून खात्यात पाठवलेले पैसे £130 दशलक्ष (रु. 1300 कोटी) आहेत.  
सॅंटेंडर बँकेलाही भीती वाटत आहे की हे पैसे बँकेत परत येणार नाहीत. कारण लोकांनी तो नाताळच्या काळात खर्च केला असावा. 
अशा स्थितीत बँक ग्राहकांना जबरदस्तीने पैसे परत देण्यास सांगणार.अशी शक्यता आहे. दुसरीकडे, बँकेकडे दुसरा पर्याय म्हणजे त्या ग्राहकांकडे जाऊन हे पैसे परत घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँकेकडून एक निवेदनही आले असून, तांत्रिक बिघाडामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.जे चुकून दुसऱ्या खात्यात गेले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती