जगातील 'सर्वात लहान महिलेचे निधन, उंची फक्त 2.5 फूट होती
रविवार, 2 जानेवारी 2022 (17:04 IST)
संपूर्ण जगातील सर्वात लहान महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलिफ कोकमन यांचे निधन झाले. तुर्कीच्या उस्मानिया प्रांतातील कादिर्ली शहरातील रहिवासी असलेल्या एलिफचे वय अवघे 33 वर्षे होते. जगातील सर्वात लहान महिला म्हणून तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.
वृत्तानुसार, एलिफ मंगळवारी आजारी पडली तिला न्यूमोनियाचा त्रास झाला. नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यातन तिचा अवयवांनी हालचाल करणे बंद केले. रुग्णालयात नेल्यावर तिची प्रकृती खालावत गेली आणि तिचे निधन झाले.