रेस्टॉरंटमध्ये रोबोट बनले वेटर

चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून ते त्यांचे पदार्थ सर्व्ह करून बिल देण्यापर्यंतची वेटरची सर्व कामे रोबोट करत आहेत. याचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना होत आहे. ग्राहकांना येणारे बिल 75 टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच त्यांना
 
जलद आणि अयावत सेवा मिळत आहे. याआधी रेस्टॉरंटमध्ये दोन जणांसाठी 300 ते 400 युआन खर्च येत आहे. सध्या रेस्टॉरंटमध्ये वेटरऐवजी रोबोट काम करत असल्याने आता फक्त 100 युआनएवढाच खर्च येत आहे. त्यामुळे आगामी काळात चीनच्या रेस्टॉरंटमध्ये हीच संकल्पना राबवण्याची ई कॉमर्स कंपनी अलिबाबाची योजना आहे. रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करून सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचा अलिबाबाचा विचारआहे. 
 
सध्या कंपनीने कर्मचार्‍यांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी रोबोटची कार्यक्षमता वाढवली आहे. ओव्हनच्या आकाराचे रोबोट वेटरची सर्व कामे करत आहेत. शांघायमध्ये वेटरला दर महिन्याला 10 हजार युआन द्यावे लागत होते. 
 
तसेच रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या दोन शिफ्ट लावण्यात येत होत्या. त्यामुळे कर्मचार्‍यावर मोठ्या प्रमाणात खर्च येत होता. आता रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम रोबोट करत असल्याने पूर्ण दिवस न थकता रोबोट काम करु शकतात. तसेच त्यांच्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नसल्याचे अलिबाबाचे प्रोडक्ट मॅनेजर काओ हैतो यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती