महाराष्ट्र मंडळ, लंडनच्या 85व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 2 ते 4 जून या काळात लंडन मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रीयांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने हा मोठा पुढाकार आहे.
मराठी माणसाचे यश, सिद्धी आणि भरभराट साजरा करण्यासाठी होणार्या संमेलनात कौशल्या, संगीत कला, सर्जनशीलता यांचे दर्शन घडेल. दुबई, अमेरिका, भारत व अन्य देशांतील मराठी उद्योजकांचा सत्काराबरोबच संगीत, विनोद असे कार्यक्रम तर असतीलच, शिवाय स्वादिष्ट मराठी जेवण व विविध क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटविणार्या 33 मराठी नामवंतांशी गप्पांचाही कार्यक्रम असेल. जन्मभूमीची जाणीव रुजविणे, मराठी माणसांना एकत्र आणणे, मरठी संस्कृतीचा पेटारा पुन्हा उलगडणे आणि येणार्या पिढीला मी मराठी असल्याची जाणीव करून देणे, हे या संमेलनाचे उद्दिष्ट आहे. क्रूझमधून टेम्स नदीची सफर हा कार्यक्रम आणि या गोजिरवाण्या घरात या नाटकाचा प्रयोग हेही संमेलनाचे वैशिष्ट्य असेल.