वादळी वाऱ्यातून उडून बाळ झाडावर अडकले,सुदैवाने बचावले

शनिवार, 16 डिसेंबर 2023 (17:53 IST)
असं म्हणतात की दैव तारी त्याला कोण मारी असच काहीसे घडले आहे. अमेरिकेत. अमेरिकेच्या सेंट्रल टेनेसीमध्ये भीषण चक्री वादळाचा कहर असल्यामुळे घरे, दुकाने आणि आस्थापनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे व खांब पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या चक्रीवादळामुळे अनेक जण मृत्युमुखी झाले आहे. या वादळी वाऱ्यात एक चार महिन्याचे बाळ पाळणासह उडाले. बाळ वादळी वाऱ्यात उडाल्यामुळे आई-वडिलांनी आशाच सोडल्या होत्या. पण दैवाचा चमत्कार आहे की पाळणासह उडालेले हे बाळ चमत्कारिकरित्या बचावले. उडून हे बाळ मुसळधार पावसामुळे पडलेल्या एका झाडात सापडले. हे बाळ सुखरूप होते. 
 
वृत्तानुसार, बाळाची आई सिडनी मूर यांनी सांगितले की, वादळी वारे वेगाने आले आणि त्यांच्या घराची छत देखील उडाली. या वाऱ्यात पाळण्यात झोपलेले 4 महिन्याचे बाळ देखील पाळणासह उडाले. बाळाचे वडील त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मागे धावले आणि वाऱ्यासह ते देखील उडाले. तरीही त्यांची धडपड बाळाला पकडण्यासाठी सुरूच होती.  

बाळाच्या आईने बाळाच्या भावाला प्रीस्टनला सांभाळले.घराची भिंत देखील या वाऱ्यात पडली.उलटलेल्या ट्रेलरच्या खाली मूर आणि त्यांचे 1 वर्षाचे मुल अडकले होते. 

वादळी वाऱ्यात उडालेले बाळ त्याच्या वडिलांना एका पडलेल्या झाडात अडकलेले दिसले.आम्हाला वाटले की बाळ आता जगात नसेल पण देवाची कृपा की तो सुखरूप एका झाडात अडकलेला दिसला.  
या वादळी वाऱ्यामुळे बाळाला, त्याच्या 1 वर्षाच्या भावाला आणि वडिलांना किरकोळ  दुखापत झाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती