पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर काही पोलीस ठार झाले. या हल्ल्यात अन्य सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास दरबन तहसीलमध्ये काही दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्यावर जोरदार शस्त्रांनी हल्ला केला.
जखमींना DHQ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर ग्रेनेड आणि जोरदार गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले असले तरी अंधाराचा फायदा घेत सर्व दहशतवादी पळून गेले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीमही राबवली जात आहे.