शिक्षकांनी मोबाईल जप्त केला, रागात विद्यार्थिनीने शाळाच पेटवली, २० जणांचा होरपळून मृत्यू

साऊथ अमेरिकेच्या गुयाना येथे रागात एका १४ वर्षाच्या विद्यार्थिनीने तिच्याच शाळेत आग लावल्याचा आरोप आहे. या भयंकर घटनेत २० जणांचा मत्यू झाल्याची बातमी आहे.
 
सूत्रांप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थिनीकडील मोबाईल जप्त केल्याने मुलीचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात विद्यार्थिनीने शाळेला आग लावण्याची धमकीही दिली आणि नंतर महदिया सेकेंडरी स्कूलच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये आग लागली. यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक फसले. 
 
गयानाच्या अग्निशमन सेवेने एका निवेदनात म्हटले आहे की, "अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले तेव्हा इमारत पूर्णपणे वेढली गेली होती."
 
विभागाने सांगितले की १४ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आणि पाच जणांचा स्थानिक रुग्णालयात मृत्यू झाला. दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असून चार जण गंभीर भाजल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
सहा विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करून जॉर्जटाउनला उपचारासाठी नेण्यात आले आहे, तर इतर पाच जणांवर महदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 10 जण डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गोविया म्हणाले की शाळेत मुख्यतः 12 ते 18 वयोगटातील स्थानिक मुले शिकतात.
photo: symbolic

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती