स्पर्म डोनेशनमुळे तिचा जन्म झाला, पण नंतर वडिलांच्या शोधात धक्कादायक सत्य समोर आलं...

गुरूवार, 25 मे 2023 (18:39 IST)
BBC
ईव्ह विलीच्या लेखणीतून
 
ईव्ह विली त्यावेळी 16 वर्षांची होती. त्याच वेळी तिला आपण स्पर्म डोनेशनमधून जन्माला आलो असल्याची माहिती मिळाली.
 
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात राहणाऱ्या ईव्हसाठी ही गोष्ट आश्चर्यजनक अशीच होती. पण आपले खरे वडील कोण आहेत, या उत्सुकतेपोटी अनेक धक्कादायक गोष्टींचा सामना तिला करावा लागला.
 
खरंतर लहानपणापासून ईव्ह ज्यांना आपले वडिल मानायची त्यांचं ती 7 वर्षांची असतानाच हृदयरोगाने निधन झालं होतं.
 
यानंतर ईव्हची ओळख आपल्या स्पर्मदात्या पित्याशी झाली. त्यावेळी तिने त्या व्यक्तीला डॅड असं संबोधणंही सुरू केलं होतं. इतकंच नव्हे तर आपल्या लग्नात तिने त्यांना वडिलांचा मानही दिला.
 
ईव्ह विली त्यावेळी 16 वर्षांची होती. त्याच वेळी तिला आपण स्पर्म डोनेशनमधून जन्माला आलो असल्याची माहिती मिळाली.
 
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात राहणाऱ्या ईव्हसाठी ही गोष्ट आश्चर्यजनक अशीच होती. पण आपले खरे वडील कोण आहेत, या उत्सुकतेपोटी अनेक धक्कादायक गोष्टींचा सामना तिला करावा लागला.
 
खरंतर लहानपणापासून ईव्ह ज्यांना आपले वडिल मानायची त्यांचं ती 7 वर्षांची असतानाच हृदयरोगाने निधन झालं होतं.
 
यानंतर ईव्हची ओळख आपल्या स्पर्मदात्या पित्याशी झाली. त्यावेळी तिने त्या व्यक्तीला डॅड असं संबोधणंही सुरू केलं होतं. इतकंच नव्हे तर आपल्या लग्नात तिने त्यांना वडिलांचा मानही दिला.
 
यानंतर लगेच मी गुगलवर कॅलिफोर्निया क्रायोबँकबाबत माहिती शोधली. तेव्हा ते एक कृत्रिम गर्भधारणा करून देणारं केंद्र असल्याचं माझ्या निदर्शनास आलं.
 
त्यामुळे, मीसुद्धा याच रुग्णालयातून कृत्रिम गर्भधारणेतून जन्मलेले आहे, हे समजण्यास मला वेळ लागला नाही.
 
ही गोष्ट समजल्यानंतर मला सुरुवातीला काहीसा धक्का बसला. त्याचसोबत मी संभ्रमावस्थेतही होते.
 
कोणत्याही कुटुंबाची काही ना काही गुपितं असतात. पण मला एक लक्षात आलं की आमच्या कुटुंबाचं सर्वांत मोठं गुपित तर मी स्वतः होते.
 
माझे वडील कोण?
माझ्या वडिलांचं म्हणजे मी आतापर्यंत ज्यांना माझे वडील मानत आले होते, त्यांचं नाव होतं डग. डग वारले होते, पण या निमित्ताने मला वडील नाहीत, हे मला विसरायला झालं. त्यामुळे आपल्या वडिलांचा शोध घेण्याचं माझ्या मनात कित्येक दिवस घर करून होतं.
 
मी 18 वर्षांची होते, तेव्हा मी त्यांचा शोध सुरू केला. मी माझ्यासंदर्भातली आईची सगळी वैद्यकीय कागदपत्रे आणि इतिहास तपासला.
 
1980 च्या दरम्यान मी आईच्या पोटात होते. त्यावेळी रुग्णालयात केवळ स्थानिक दात्यांच्या माध्यमातूनच कृत्रिम गर्भधारणा केली जायची. यादरम्यान वीर्यदात्याची कोणतीही माहिती रुग्णाला दिली जात नव्हती.
 
खरं र आमचं गाव तसं लहानच होतं. पण त्यावेळच्या स्थानिक दात्याचा शोध आता घेणं म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखा प्रकार होता.
 
शिवाय, आम्ही ठिकठिकाणी फिरून माझे वडील कोण, म्हणत शोधूही शकत नव्हतो.
 
त्यामुळे आम्ही रुग्णालयाच्या बाजूने तपास करायचं ठरवलं.
 
कॅलिफोर्निया क्रायोबँकमध्ये तुम्हाला तुमचा वीर्यदाता निवडायचं स्वातंत्र्य असतं. संबंधित दात्याचं नाव जरी माहिती नसलं तरी त्याची शारिरीक ठेवण, छंद, आवडीनिवडी, शिक्षण, रक्तगट आणि इतर महत्त्वाची माहिती रुग्णांसमोर ठेवली जाते.
 
आपल्याला आवडतं ते प्रोफाईल निवडून त्यामधून आपण कृत्रिम गर्भधारणा करून घेऊ शकतो, अशी ही व्यवस्था आहे.
 
माझ्या आई-वडिलांनी त्यावेळी 106 नंबरचं प्रोफाईल निवडल्याची माहिती मला मिळाली. माझ्या आईने तेव्हाची ती पावती जपून ठेवलेली होती.
 
सुरुवातीला मला फक्त ती व्यक्ती कोण आहे, हे जाणून घेण्याबाबत उत्सुकता होती. पण नंतर नंतर माझे वडील या नात्याने त्यांना भेटावं, असं मला वाटू लागलं.
 
कॅलिफोर्निया क्रायोबँककडे मी 106 नंबरच्या प्रोफाईलबाबत विचारणा केली. अखेर, एका वर्षाने त्यांच्याकडे पाठपुरावा करून मला त्यांचा ई-मेल आयडी मिळाला.
 
सुरुवातीला ई-मेल आणि नंतर फोनवर आम्ही बोलू लागलो.
 
अथक प्रयत्नांनी मला सापडलेल्या माझ्या वडिलांचं नाव स्टीव्ह असं होतं. ते एक खूपच चांगलं व्यक्तिमत्त्व होतं.
 
शांत स्वभावाचे, माझी काळजी घेणारे मला भेटले होते. खरंच हे सगळं खूप आनंदायी होतं. एका चांगल्या स्वप्नाप्रमाणे मला ते भासलं.
 
हॉरर चित्रपटांमध्ये पाहतो, तसं काहीच माझ्याबाबतीत घडलं नाही.
 
मुलाच्या DNA मधून लागला सुगावा
काही वर्षांनी माझं लग्न झालं. वडील स्टीव्ह यांनाही मी त्या लग्नात बोलावलं. त्यांनीही या लग्नाला वडील या नात्यानेच हजेरी लावली.
 
वर्षभरातच हटन नावाचा एक गोंडस मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. सगळं खूप छान सुरू होतं.
 
पण काही दिवसांतच हटनला काही वैद्यकीय समस्या असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. तो सतत आजारी पडायचा. डॉक्टरही त्याच्या या स्थितीचं स्पष्ट निदान करू शकले नव्हते.
 
हटन 3 वर्षांचा असताना आम्ही त्याची डीएनएसंदर्भात एक चाचणी केली. त्यामध्ये हटनला एक जनुकीय आजार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हटनला एक सेलिअॅक नामक ऑटोईम्यून प्रकारचा दुर्मीळ आजार होता.
BBC
तो त्याला वंशपरंपरागतरित्या मिळाला आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं. शक्यतो हा आजार त्याला माझ्यामार्फत मिळालेला असू शकतो, पण काही कारणाने माझ्यावर त्याचा प्रभाव दिसलेला नाही, असंही त्यांनी म्हटलं.
 
मला ते ऐकून आश्चर्य वाटलं. कारण माझं कुटुंब किंवा वडील स्टीव्ह यांचं कुटुंब यांच्यापैकी कुणामध्येही अशा प्रकारची लक्षणे ऐकिवात नव्हती. शिवाय हटनचा डीएनए स्टीव्ह यांच्याशी जुळत नव्हता.
 
चाचणीदरम्यान हटनच्या डीएनएशी जुळणाऱ्या काही जणांची यादी मला सापडली. तेव्हा माझी आई म्हणाली, ईव्ह, "हे तुझे भावंड तर नाहीत ना?"
 
यानंतर मी त्या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागले. ते तसे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते.
 
काही दिवसांनी माझ्या प्रयत्नांना यश आलं. यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या व्यक्तीशी मी भेटले.
 
पण त्या व्यक्तीच्या बोलण्यात काहीच आश्चर्य वगैरे दिसून आलं नाही.
 
तो म्हणाला, "हो मी तुझा भाऊ असू शकतो आणि आपले खरे म्हणजेच बायोलॉजिकल वडील कोण आहेत, तेसुद्धा मला माहीत आहे."
 
यानंतर त्याने मला जे नाव सांगितलं, ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली.
 
तो व्यक्ती म्हणाला, आपले दोघांचेही वडील आहेत किम मॅकमॉरीस, या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर होते. तुझ्या आईवरचे उपचारही किमनेच केले होते."
 
मला वाटलं हा काहीही बरळतोय. त्यामुळे त्यानंतर मी यादीतील आणखी दोघा-तिघांशी बोलले. त्यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर सगळी चर्चा फिरून एकाच नावापाशी येऊन थांबायची. ते म्हणजे किम मॅकमॉरीस.
 
अखेर सत्य समोर
आईवर उपचार करणारे डॉक्टर किम मॅकमॉरीसचं सत्य अखेर माझ्यासमोर आलं. किम यांनी आईवर उपचार करताना 106 नंबरच्या प्रोफाईलच्या स्पर्मऐवजी आपले स्वतःचे स्पर्म गर्भधारणेसाठी वापरले होते.
 
असंच कृत्य किम मॅकमॉरीस यांनी इतर अनेक रुग्णांसोबत केलेलं असावं.
 
माझ्यासाठी तर ते खरंच प्रचंड धक्कादायक आणि चिड आणणारं होतं. मी शोधल्यानंतर मला सापडलेले माझे वडील स्टीव्ह आणि माझ्यातील नातेसंबंध नुकतेच खुलू लागले होते. अशा स्थितीत माझ्या वडिलांचा शोध या डॉक्टरपर्यंत येऊन थांबला.
 
वडिलांना भेटण्याच्या अपेक्षेने इतकी उठाठेव केल्यानंतरही मी डॉ. किम यांना भेटले खरी. पण त्यांना वडील मानण्यास माझं मन तयार होत नव्हतं.
 
त्यांनी माझ्या आईसोबत जे काही केलं, ते आठवताच माझी तळपायाची आग मस्तकाला जात होती.
 
शिवाय, आता वडील स्टीव्ह यांना गमावण्याची भीतीही मला सतावू लागली. सरतेशेवटी आईचा विचारही माझ्या मनात आला. तिला या सगळ्या प्रकाराबद्दल कळलं तर किती वाईट वाटेल, मला कल्पनाही करवत नव्हती.
 
तिला हे सांगावं की नको या द्विधा मनस्थितीतून मी माझा फोन बंद करून टाकला. एका क्षणी वाटलं की जे मला आत्ता कळलं ते कळलंच नाही, असं भासवावं. असं केल्यास सगळे जणच आनंदी असतील.
 
पण, याबाबत संपूर्ण विचाराअंती सत्याला सामोरं जाण्याचा निर्णय मी घेतला.
 
मी आईला जाऊन भेटले, तिलां म्हणाले, "आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. स्टीव्ह माझे वडील नाहीत. माझे वडील डॉ. किम मॅकमॉरीस आहेत. ज्यांनी त्यावेळी तुझ्यावर उपचार केले होते."
 
आईला धक्का बसणार हे स्वाभाविकच होतं. मी सांगितलेलं ऐकताच तिचे हात थरथरू लागले. उभ्या-उभ्या तिच्या डोळ्यासमोर अंधारी येऊन तिने बसकण घेतली.
 
माझा नवराही यावेळी बाजूलाच होता. तिने तिला सांभाळलं. अँम्ब्युलन्स बोलावण्याबाबतही विचारलं.
 
तेव्हा आई म्हणाली, "असं होऊ शकत नाही. तो खूप चांगला माणूस होता. तो असं कसं करू शकतो?"
 
आम्ही तिला त्याबाबत शांतपणे समजावून सांगितलं.
 
मी आईला म्हणाले, "आई, जे घडलं ते वाईट होतं. पण यातून मी तुझ्या आयुष्यात आले. आता तुझी मुलगी तुझ्यासोबत आहे, ती नेहमी तुझ्यासोबतच राहील. इतर गोष्टींना तू थारा देऊ नकोस. त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. "
 
पण या गोष्टीचा आईला चांगलाच धक्का बसल्याचं मला जाणवलं होतं. डॉ. किमने आमच्या परवानगीशिवाय आमच्या जीवनात कायमचा प्रवेश केला होता.
 
डॉ. मॅकमॉरीस यांचं स्पष्टीकरण
डॉ. मॅकमॉरीस यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणताच फौजदारी किंवा दिवाणी कायदा मला मदतीचा वाटला नाही. कारण त्यावेळी हे प्रकरण कायद्याच्या अखत्यारित यायचं नाही.
 
पण, मी डॉ. मॅकमॉरीस यांना एक पत्र लिहिलं. घडल्या प्रकरणाबाबत मी त्यांना अत्यंत विनम्रपणे जाब मागितला.
 
त्यांचं उत्तर होतं, "हो, असं असू शकतं. पण आपल्याकडे त्याबाबतचे रेकॉर्ड आता उपलब्ध नाहीत. कारण आम्ही केवळ सात वर्षे ते रेकॉर्ड जपून ठेवायचो. पण क्रायोबँकमधील काही स्पर्म डोनर्सच्या वीर्याचे नमुने गर्भ राहण्यासाठी उपयुक्त ठरत नसल्याने मी तिथे माझे सँपल ठेवले होते."
 
मीसुद्धा एक स्पर्म डोनर होतो. मी माझे नमुनेही कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरत होतो.
 
डॉ. मॅकमॉरीस म्हणाले, "तुझ्या आईला कोणत्याही स्थितीत आई व्हायचंच होतं. ते खूप काळ त्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे मी त्यांच्यासाठीच्या नमुन्यांमध्ये माझ्या वीर्याची बाटली ठेवून दिली होती."
 
जर अशा प्रकारे त्यांचं स्पर्म वापरण्यात काहीच चुकीचं नव्हतं तर त्यांनी ते त्यावेळीच का सांगितलं नाही. त्यांनी माझ्या आईला त्यावेळी म्हणायला हवं होतं, "माझं स्पर्म वापरल्यास गर्भधारणेत यश मिळण्याची शक्यता जास्त आहे."
 
त्यांनी तसं केलं असतं तर आईलाही त्याबाबत स्पष्ट कल्पना असली असती. त्यामुळे तिला याबाबत काहीएक माहिती नव्हतं ही खरी समस्या आहे. कारण, तिला जर हे समजलं असतं तर तिने नकारही दिला असता. हे तिच्या मर्जीनुसार झालेलं नाही.
 
मॅकमॉरीसने अशा प्रकारे फसवलेले एकूण 13 जण मला भेटले. सुदैवाने मी शोधलेले माझे वडील स्टीव्ह या सगळ्या गोष्टी समजूनसुद्धा माझ्यापासून दूर गेले नाहीत. उलट त्यांचं आणि आमचं नातं आणखी घनिष्ट बनलं.
 
कायद्यात बदल
ईव्ह विली यांचं प्रकरण समोर आल्यानंतर अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचं कृत्य हे गुन्ह्याच्या कक्षेत आणण्यात आलं. तसंच अनेक राज्यांमध्ये अशा गुन्ह्यांवर मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली.
 
बीबीसी आऊटलूकच्या एका कार्यक्रमात ईव्हने आपली कहाणी सांगितल्यानंतर अनेकांनी तिच्याशी संपर्क साधला. आपल्यासोबतही असा प्रकार घडल्याचं अनेकांनी मान्य केलं.
 
ईव्हची कायदेशीर लढाई टेक्सास प्रांतापासून सुरू झाली. त्यानंतर सुमारे 11 प्रांतांमध्ये कृत्रिम गर्भधारणेविषयी कायदे तयार करण्यात आले आहेत.
 
बीबीसी मुंदोला आपली आपबिती सांगून या क्षेत्रात होणारी फसवणूक तसंच विश्वसनीयतेचा अभाव याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा ईव्हचा प्रयत्न आहे.
 
ती म्हणते, "माझ्या दुःखातून मला हा उद्देश मिळाला. त्यामुळे माझं दुःख विसरायचं असल्यास मला हे करावंच लागेल."
 
बीबीसीने या प्रकरणात डॉ. किम यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. पण डॉ. किम यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती