Sri Lanka News: श्रीलंकेच्या पोलिसांनी माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या मुलांना अटक केली आहे.राजपक्षे यांचा मुलगा योशिता याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. कोलंबो: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या अचानक झालेल्या अटकेमुळे श्रीलंकेत खळबळ उडाली आहे. माजी राष्ट्रपतींचे पुत्र योशिता राजपक्षे यांना शनिवारी मालमत्ता खरेदी प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.
तसेच महिंदा राजपक्षे यांचा मुलगा देखील पूर्वी नौदल अधिकारी राहिला आहे. आता त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. माजी नौदल अधिकारी योशिता यांना त्यांच्या मूळ गावी बेलियाट्टा येथून अटक करण्यात आली. 2015 पूर्वी त्यांचे वडील राष्ट्रपती असताना मालमत्ता खरेदीतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली आहे. योशिता हा महिंदा राजपक्षेच्या तीन मुलांपैकी दुसरा आहे.