स्पेसएक्स कॅप्सूल सुनीता विल्यम्ससह पृथ्वीसाठी रवाना

मंगळवार, 18 मार्च 2025 (11:37 IST)
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन स्पेसएक्स कॅप्सूल पृथ्वीवर रवाना झाले आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बुधवारी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 वाजता पृथ्वीवर परततील.
ALSO READ: सुनीता विल्यम्सची घरी परतण्याची तारीख निश्चित झाली
सुनीत विल्यम्स आणि इतर तीन अंतराळवीरांना आज सकाळी आयएसएसमधून अनडॉक केले. अंतराळवीरांचा हा प्रवास 17 तासांचा असणार आहे. ते फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरतील
ALSO READ: दोन्ही अंतराळवीर नऊ महिन्यांनी उद्या लवकर पृथ्वीवर परततील
गेल्या वर्षी 5 जून 2025 रोजी नासाच्या मोहिमेचा भाग म्हणून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी बोईंग अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण केले. त्यांना तिथे फक्त एक आठवडा थांबायचे होते पण अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते दोघेही पृथ्वीवर परतू शकले नाहीत. त्या दोघांसाठी, 10 दिवसांचे मिशन 9  महिन्यांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेत बदलले.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: सुनीता विल्यम्स-बुच विल्मोर नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परततील

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती