पीएमएल-एनचे ज्येष्ठ नेते शेहबाज शरीफ यांची दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. शाहबाज शरीफ यांनी शनिवारी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला. पंतप्रधानपदासाठी रविवारी निवडणूक झाली, ज्यामध्ये शाहबाज शरीफ यांची देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. शहबाज शरीफ यांच्याशिवाय पीटीआय नेते उमर अयुब खान यांनीही पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, रविवारी झालेल्या निवडणुकीत उमर अयुब खान यांना पुरेसा पाठिंबा मिळू शकला नाही.
शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शहबाज शरीफ हे एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधानही राहिले आहेत. त्यावेळीही त्यांनी पीपीपीसोबत आघाडी करून सरकार चालवले होते. पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी शाहबाज शरीफ यांना 336 सदस्यीय सिनेटमध्ये 169 मतांची गरज होती, जी शाहबाज शरीफ यांनी सहज गोळा केली. पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांचे संयुक्त उमेदवार 72 वर्षीय शाहबाज यांना 336 सदस्यांच्या सभागृहात 201 मते मिळाली.