पाकिस्तानात भारतीय सिनेमावरील बंदी उठली

सोमवार, 19 डिसेंबर 2016 (11:44 IST)
कराची- पाकिस्तानात सिनेमा उद्योग सुरळीत करण्यासाठी भारतीय सिनेमावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक तंगीमुळे परेशान सिनेमाघर मालक संघाने ही घोषणा केली असून सोमवारपासून सिनेमांचे प्रदर्शन सुरू करण्यात आले.
 
फिल्म एग्जिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष जोराइश लशारी यांनी सांगितले की संबंधित पक्षांबरोबर विचार विमर्श केल्यानंतर 19 डिसेंबरपासून भारतीय सिनेमांची स्क्रीनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
भारतीय सिनेमांवर बंदी घातल्यामुळे सिनेमाघर मालक आणि या उद्योगाशी जुळलेल्या लोकांना नुकसान झाले आहे. येथील सिनेमा व्यवसाय भारतीय नवीन चित्रपटांवर अवलंबून असतो, कारण सिनेप्लेक्स आणि म्लटीप्लेक्ससाठी येथे खूप निवेश करण्यात आला आहे.
 
मंडवीवाला एंटरटेनमेंट प्रमुख नदीम मंडवीवाला यांनी सांगितले की बंदी दरम्यान रिलीज झालेले चित्रपट आधी प्रदर्शित केले जातील.
 
पाकिस्तानाची सिनेमा चेन सुपर सिनेमाने या वर्षी 30 सप्टेंबरला पाकिस्तानी सेनेच्या समर्थनात आपल्या सर्व सिनेमाघरांमध्ये तात्काळ प्रभावाने भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. यापूर्वी 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध काळात पाकिस्तानात भारतीय चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली गेली होती जी 43 वर्षांनंतर 2008 मध्ये हटविण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा