राजेंद्र सिंह यांना ‘स्टॉकहोम’ पुरस्कार

मंगळवार, 24 मार्च 2015 (14:40 IST)
‘पाणीवाले बाबा’ म्हणून ख्याती असणार्‍या राजेंद्र सिंह यांना २०१५ चा स्टॉकहोम पाणी पुरस्कार घोषित करण्यात आला.  भारतातील जल संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे स्वरूप १५०,००० डॉलर आणि विशेष मानचिन्ह असे आहे. २६ आॅगस्ट रोजी जागतिक जल सप्ताहादरम्यान त्यांना या पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा