पनामा पेपर्स: नवाज शरीफ, इम्रान खान अडचणीत

इस्लामाबाद- ‘पनामा पेपर्स’प्रकरणी पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नवाज शरीफ यांना नोटीस बजावली आहे. अर्थव्यवस्थांना हादरा देणारे, वित्तीय बाजार संकटात लोटणार्‍या पनामा पेपर्स प्रकरणात शरीफ यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर शरीफ यांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना ही नोटीस बजावली आहे. न्यायालयाने शरीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील नोटीस बजावली आहे.
 
शरीफ यांच्यावर भ्रष्टाचार आणि परदेशात बेकायदा संपत्ती असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाने शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांवरपनामा पेपर्स बेकायदेशीरपणे परदेशात पैसे पाठवल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यात शरीफ यांच्यासह त्यांची मुलगी, जावई आणि दोन मुलांना समावेश आहे. शरीफ यांच्यासह तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनादेखील नोटीस बजावली आहे. याशिवाय पाकिस्तानचे अर्थमंत्री इसहाक डार, गुप्तचर यंत्रणेचे महासंचलाक, अँटर्नी जनरल यांनादेखील नोटीस बजावली आहे.

वेबदुनिया वर वाचा