पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीवर आत्मघाती हल्ला झाला आहे. या स्फोटात 90 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. स्फोट एवढा जोरदार होता की त्यामुळे मशिदीचा एक भाग पूर्णपणे कोसळला असल्याचे सांगण्यात येत आहे पेशावरमधील पोलिस लाइन्सजवळ असलेल्या मशिदीत जोहरच्या नमाजानंतर हा स्फोट झाला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये स्फोटानंतर गोंधळाचे वातावरण दिसत आहे.
जखमींना अजूनही रुग्णालयात आणले जात आहे, काहींची प्रकृती गंभीर आहे. परिसराची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली असून केवळ रुग्णवाहिकांनाच प्रवेश दिला जात आहे इमारतीचा काही भाग कोसळला आहे. अनेक लोक त्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा स्फोट दुपारी 1:40 च्या सुमारास झाला.या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी याचा निषेध केला आहे.