पाकिस्तानची अर्थव्यवस्था गडगडली, एका डॉलरसाठी द्यावे लागतात 240 रुपये

गुरूवार, 12 जानेवारी 2023 (09:31 IST)
पाकिस्तानशी संबंधीत अनेक व्हीडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. बहुतांश व्हीडिओमध्ये लोक पोळी-भाजी मिळण्यासाठी झगडत आहेत, असा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
 
ही व्हीडिओ क्लिप पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणि वाढत्या महागाईची स्थिती दाखवण्यासाठी शेअर केली जात आहे.
 
व्हीडिओसह काही तज्ज्ञांच्या कमेंट्सही व्हायरल होत आहे. अशीच एक टिप्पणी अमेरिकेच्या डेलावेयर विद्यापीठाचे प्राध्यापक मुक्तदर खान यांनी केली आहे. ते भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत.
 
मुक्तदर खान एका पाकिस्तानी पत्रकाराला सांगत आहेत, “भारत आणि पाकिस्तानमध्ये जे असंतुलन आहे, ते पाकिस्तानच्या बाजूने असतं तर आतापर्यंत तुम्ही काश्मीरसाठी हल्ला केला असतात. तुम्ही सांगायला सुरुवात केली असती की पाहा, भारताची अर्थव्यवस्था लयाला जात आहे. भारतातून तामिळनाडू वेगळा होत आहे, तसेच आसाम वेगळा होत आहे वगैरे... आता भारतावर हल्ला करा.... परंतु पाकिस्तानची आजची स्थिती याच्याबरोबर उलट आहे. आणि या परिस्थितीचा भारतीय नेतृत्व फायदा घेत नाहीये.”
 
पाकिस्तानी पत्रकार फखर युसुफजई मुक्तदर खान यांना म्हणाले, “अमेरिका पाकिस्तानला जितकी मदत करू शकत होता तितकी त्यांनी मदत केली आहे. आता अमेरिकेला पाकिस्तानात अजिबात रस उरलेला नाही. त्यांना आतंकवादाशी लढा द्यायचा आहे आणि आता ते पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकत नाही.
 
पाकिस्तानला यावर्षी दोन लढाया लढायच्या आहेत. एक तर टीटीपीशी लढायचं आहे. टीटीपीचा नकाशा पाहिला तर त्यात पीओकेसुद्धा आहे. आता पाकिस्तानात अडचणी आहेत. आता भारत त्याला आणखी अडचणीत टाकू इच्छित नाही.”
 
पाकिस्तान त्यांच्या आर्थिक संकटाच्यामध्ये काही प्रमाणात मदत मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आहे. जिनिव्हामध्ये पाकिस्तानला एका डोनर कॉन्फरन्स मध्ये 9 अब्ज डॉलर पेक्षा जास्त मदत देण्याची घोषणा केली आहे.
 
पाकिस्तानसाठी ही मोठी बातमी आहे. आता देशाची गंगाजळी कमी होत आहेत. पाकिस्तानकडे साडेचार अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी उरली आहे. येत्या काही आठवड्यात हे आयातीच्या बिलातच खर्च होतील.
 
पाकिस्तानवर सध्या खर्चाचा बोजा जास्त आहे. जिनिव्हाच्या परिषदेत 9 अब्ज डॉलर आणणं हे शरीफ सरकारचं यश मानलं जात आहे.
 
सौदीच्या मदतीने परिस्थिती बदलणार नाही
याआधी मंगळवारी सौदी अरेबियाने इशारा दिला होता की पाकिस्तान जुने कर्ज आणि गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानला आधी दिलेले तीन अब्ज डॉलरचं कर्ज पाच अरब डॉलर करण्याचा विचार करत होता. त्याचबरोबर गुंतवणूक वाढवण्याचा विचारही करत होता.
 
त्याशिवाय जगाच्या इतर संस्थांनीसुद्धा पाकिस्तानला 8.7 अब्ज डॉलर तीन वर्षांत देण्याचं आश्वासन दिलं आहे. ही रक्कम कर्ज म्हणून मिळणार की कर्ज म्हणून हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
जिनेव्हा मध्ये परिषदेचं आयोजन केलं, त्याचं नाव होतं, “International Conference on climate resilient Pakistan’
 
ही परिषद संयुक्त राष्ट्रांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये मागच्या वर्षी भीषण पूर आला होता. त्यात लाखो लोक प्रभावित झाले होते.
 
या परिषदेत संयुक्त राष्ट्रांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. संयुक्त राष्ट्र आणि पाकिस्तानच्या आवाहनावर अनेक सरकार, संस्था आणि लोकांनी 9 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मदतीचं आश्वासन दिलं आहे.  
 
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटानियो गुटेरस यांनी ट्विट केलं, “पाकिस्तान मध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिनिव्हा परिषदेत 9 अब्ज डॉलरचा निधी जुळवण्यात यश मिळालं आहे. त्यासाठी मी आंतरराष्ट्रीय संप्रदायाचा आभारी आहे.”
 
सध्या होणाऱ्या परिस्थितीवर पाकिस्तानचे मुख्य वर्तमानपत्र डॉन ने 11 जानेवारी ला संपादकीय लिहिलं आहे.
 
“सरकारी अधिकारी अशा प्रकारे शेखी मिरवत आहेत, की जणू काही संकटावर तोडगाच निघाला आहे. मात्र पाकिस्तानमध्ये डॉलरचा तुटवडा कमी होताना दिसत नाही हीच सत्य परिस्थिती आहे.”
 
“पाकिस्तानची केंद्रीय बँक एसबीपीची परकीय गंगाजळी कमी होऊन 4.5 अब्ज डॉलर झाली आहे. चार आठवड्यात आयातीला जितका खर्च होतो त्यापेक्षाही ही रक्कम कमी आहे. पाकिस्तानला तातडीने परकीय गंगाजळीची गरज आहे. जेव्हापर्यंत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष शी चर्चा करून अंतिम स्वरुप देत नाही तोपर्यंत जेनेव्हा परिषद आणि आणि अन्य संस्थांकडून मदत मिळणं अशक्य आहे.”
 
 संपादकीयात पुढे म्हटलं आहे, “शहबाज शरीफ यांन जेनेव्हा परिषदेत आठ अरब डॉलर आणण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम आणण्याचं आश्वासन त्यांनी लोकांना दिलं आहे. मात्र हा समस्येवर तोडगा नाही. पाकिस्तानला दीर्घकालीन सुधारणा कराव्या लागतील.”
 
चिंताजनक स्थिती
पाकिस्तानमधील आर्थिक स्तंभलेखक फारुक सलीम न्यूज चॅनेलवर झालेल्या एका चर्चेत म्हणाले, “पाकिस्तानजवळ साडेचार अब्ज डॉलर आहेत. ते पुढचे 20 दिवस पुरे पडतील. सध्या अतिशय भीषण परिस्थिती आहे. मला असं वाटतं की पाकिस्तानला आता फक्त IMF वाचवू शकतं. सौदी अरेबियाकडून पैसे मिळण्यास वेळ लागू शकतो.
 
एका डॉलरसाठी पाकिस्तानला 240 रुपये द्यावे लागत आहेत. इंधनापासून ते खाण्यापिण्यापर्यंतच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत.
 
पाकिस्तानमध्ये सध्या कांद्याची किंमत 240 रुपये आहे. पाकिस्तान सरकारने उर्जेचा अपव्यय कमी करण्यासाठी मार्केट, मॉल, लग्नाचे हॉल लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
 
मागच्या आठवड्यात संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले की मार्केट आणि मॉल्स 8.30 पर्यंत बंद व्हायला हवेत. लग्न समारंभ 10 वाजेपर्यंत संपायला हवेत. ख्वाजा आसिफ यांच्या मते त्यातून 60 अब्ज रुपये वाचण्यास मदत होईल.
 
परकीय चलनाचे व्यापारी म्हणतात की पाकिस्तानहून अफगाणिस्तानमध्ये  डॉलर्सची तस्करी होत आहे. त्यामुळे पाकिस्तानी रुपया आणखी कमजोर होत आहे.
 
मागच्या महिन्यात एक्सचेंज कंपनीज असोसिएशन ऑफ पाकिस्तानचे चेअरम मालिक बोस्तान म्हणाले, “प्रत्येक महिन्यात कायदेशीर किंवा बेकायदेशीरपणे दोन कोटी डॉलर अफगाणिस्तानला जात आहेत. अफगाणिस्तान ट्रांझिट ट्रेडचा गैरवापर करत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गंगाजळीवर परिणाम होत आहे.
 
1965 मध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या मधे अफगाण ट्रांझिट ट्रेड करार झाला होता त्यानुसार अफगाणिस्तान पाकिस्तानच्या कराची बंदराचा वापर करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती