पाकिस्तानने मोदीकडून आकारले नेव्हिगेशन चार्जेस

सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (16:36 IST)

परदेशी दौऱ्यांच्या दरम्यान ज्या ज्या वेळी पंतप्रधान मोदींचं एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या आकाशातून गेलं, त्या त्या वेळेचं नेव्हिगेशन चार्जेस पाकिस्तानने आकारले आहेत. हे नेव्हिगेशन चार्जेस 2.86 लाख रुपये एवढे आहेत. निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी यासंदर्भात आयटीआयमधून माहिती मागवली असता, त्यांना वरील माहिती मिळाली. 

2015 मध्ये रशिया आणि अफगाणिस्तानच्या दौऱ्याहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळासाठी पाकिस्तानात उतरले होते. त्यावेळच्या त्यांच्या भेटीसाठी 1.49 लाख रुपयांचा नेव्हिगेशन चार्ज लावण्यात आला आहे. तसेच, मार्च 2016 मधील इराण दौऱ्यासाठी 77 हजार 215 आणि कतार दौऱ्यासाठी 59 हजार 215 रुपयांचा नेव्हिगेशन चार्ज लावण्यात आला.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती