याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय मिळत असल्याची टीका केली होती. ब्रिक्स परिषदेतील घोषणापत्रात दहशतवादी संघटनांच्या नावांचा समावेश झाल्यानंतर पाकिस्तानने या मुद्यावरील भूमिकेत बदल करण्याची तयारी दर्शवल्याचे चित्र दिसते आहे. या मुद्यावर भाष्य करताना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटना पाकिस्तानात सक्रीय असल्याचे विधान परराष्ट्रमंत्री आसिफ यांनी केले. पाकिस्तानच्या एखाद्या मंत्र्याने असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.