सध्या सुपरमार्केटचे युग अवरतले आहे. या मार्केटची दुनिया गर्भश्रीमंतांबरोबरच सामान्य आणि गरीब लोकांनाही आकर्षित करून घेत आहे. मात्र, हाँगकाँगमध्ये असे एक सुपरमार्केट आहे की तेथष एका स्ट्रॉबेरी दीड हजार रूपयांपर्यंत विकली जात आहे.
स्टॉबेरी म्हटले की लालभडक गोड रसाळ फळ डोळ्यासमोर येते. हे एक असे फळ आहे की त्याला पाहताच खाण्याची अतिव इच्छा होते. मात्र हे फळ हाँगकाँगमधील या सुपरमार्केटमधून विकत घेऊन तुम्ही खाणार नाही, असेच वाटते. कारण तेथील एका स्टॉबेरीची किंमत 17.50 पौंड अर्थात 1460.57 रूपये इतकी आहे. सिटी सुपरम मार्केटमधील हे महागडे फळ पिंक कलरच्या रबर रिंगमध्ये अत्यंत आकर्षकपणे सजवून ठेवण्यात आले आहे. याच्या सभोवताली डेकोरेटिव्ह स्ट्रॉसुद्धा रचण्यात आल्या आहेत.