अमेरिकेतील 10 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूच्या लसचा पहिला डोस दिला

गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (14:30 IST)
कोरोना विषाणूंशी लढणार्‍या जगासाठी एक चांगली बातमी आहे. आतापर्यंत 1 दशलक्षाहून अधिक लोकांना अमेरिकेत कोरोना विषाणूची लस दिली गेली आहे. रोग नियंत्रण व निवारण केंद्रे (CDC) चे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी याबाबत माहिती दिली आणि सांगितले की कोरोना विषाणूच्या लसीपैकी 10 लाखांपेक्षा लोकांना वॅक्सिनची दोनपैकी प्रथम डोस देण्यात आला आहे.
 
रेडफिल्ड ने सांगितले, 'अमेरिकेने आज एक महत्त्वपूर्ण स्थान गाठले आहे. अधिकार्‍यांच्या मते, दशलक्षाहूनही अधिक लोकांना कोरोना लसचा पहिला डोस दिला गेला आहे. ही लसीकरण मोहीम 10 दिवसांपूर्वी सुरू केली गेली.
 
माध्यमांशी संवाद साधताना सरकारच्या ऑपरेशनचे मुख्य सल्लागार मोनसेफ म्हणाले, "या महिन्यापर्यंत आम्ही 2 कोटी लोकांना लसी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकणार नाही, परंतु पुढील वर्षाच्या 2021 च्या पहिल्या तिमाहीत 100 दशलक्ष लोकांना लसी देण्याचे लक्ष्य घेऊन अमेरिका पुढे जात आहे."
 
गेल्या आठवड्यात अमेरिकेत फायझर आणि बायनटेक यांनी निर्मित केलेली लस ओळखली गेली आणि त्यानंतर या लसीच्या 30 दशलक्ष डोस वितरित करण्यात आले. या आठवड्यात, मॉडर्ना लसचे 60 दशलक्ष डोस आणि फायझर लसच्या 2 दशलक्ष डोसचे वितरण केले जाईल.
 
सांगायचे म्हणजे की अमेरिका कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 3 लाख 20 हजार लोकांचा बळी गेला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती