अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मोंटेक्रिस्टीचे गव्हर्नर नेल्सी क्रूझ यांचाही समावेश आहे. जखमींमध्ये माजी मेजर लीग बेसबॉल पिचर ऑक्टाव्हियो डोटेल यांचाही समावेश होता. त्यांनी सांगितले की, मेरेंग्यू गायिका रुबी पेरेझ सादरीकरण करत असताना नाईट क्लबचे छत कोसळले.
पेरेझचे व्यवस्थापक एनरिक पॉलिनो यांनी पत्रकारांना सांगितले की, सोमवार आणि मंगळवारी मध्यरात्रीच्या काही वेळापूर्वी त्यांचा संगीत कार्यक्रम सुरू झाला आणि सुमारे एक तासानंतर नाईट क्लबचे छत कोसळले. या अपघातात पेरेझच्या संगीत गटातील सॅक्सोफोन वादक मरण पावला, तर पेरेझसह इतर सदस्य जखमी झाले.
अध्यक्ष लुईस अबिनाडर यांनी 'एक्स' वर पोस्ट केले की सर्व बचाव संस्था बाधित लोकांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. त्यांनी लिहिले की, जेट सेट नाईटक्लबमध्ये घडलेल्या दुर्घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. अपघात झाल्यापासून, आम्ही मिनिट-मिनिट त्यासंबंधी माहिती गोळा करत आहोत.