2031 पर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अवकाशातून काढून टाकले जाईल, असे अमेरिकन अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे. यासंदर्भातील अधिकृत आराखडा अमेरिकन संसदेला पाठवण्यात आला आहे. पॅसिफिक महासागरातील एका निर्जन भागात ते उतरवण्यात येईल. या भागाला स्पेसक्राफ्ट सिमेट्री म्हणजेच स्पेसक्राफ्टचे स्मशान असे नाव देण्यात आले आहे.
योजनेनुसार, स्पेस स्टेशनचे संचालक पृथ्वीच्या वातावरणात परत जाणाऱ्या स्टेशनच्या बर्न प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतील. हे स्टेशन शक्य तितके खाली आणण्याचा प्रयत्न केला जाईल जेणेकरून ते वातावरणात सुरक्षितपणे प्रवेश करू शकेल.