नरेंद्र मोदी : 'तीस वर्षांपूर्वी सामान्य व्यक्तिप्रमाणे बाहेरून व्हाईट हाऊस पाहिलं होतं'
गुरूवार, 22 जून 2023 (20:04 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिकेमधलं नातं हे 21 व्या शतकांतील एक महत्त्वाचं नातं असेल.
पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ही मोदींची ऑफिशियल स्टेट व्हिजिट आहे.
आज मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये बायडन यांची भेट घेतली.
व्हाईट हाऊसमध्ये मोदींचं स्वागत करताना बायडन यांनी म्हटलं, “दोन्ही देशांच्या राज्यघटनेत सुरूवातीलाच तीन शब्द आहेत- वुई द पीपल. यातूनच आमचे देश म्हणून प्राधान्यक्रम काय आहेत, हे स्पष्ट होतं.”
त्यांनी पुढे म्हटलं की, दोन्ही देशांच्या नात्यामध्ये परस्परांत विश्वास आहे. त्यातून आमचं नातं दृढ होत आहे.”
“दोन्ही देश खाद्य सुरक्षा आणि ऊर्जा संकट (जे रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालं आहे.) या विषयांपासून हवामान बदलाच्या क्षेत्रापर्यंत एकत्रित काम करत आहोत.”
बायडन यांनी पुढे म्हटलं, “भारत, अमेरिका आणि संपूर्ण जगासमोर आज असा काळ आहे, जेव्हा सर्व काही वेगाने बदलत आहे. अशी संधी दशकातून एकदाच येते आणि आम्हाला माहीत आहे की, आज आम्ही जो निर्णय घेऊ त्याचा परिणाम येणाऱ्या काळावर दिसून येईल.”
“दोन्ही देश खाद्य सुरक्षा आणि ऊर्जा संकट (जे रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालं आहे.) या विषयांपासून हवामान बदलाच्या क्षेत्रापर्यंत एकत्रित काम करत आहोत.”
बायडन यांनी पुढे म्हटलं, “भारत, अमेरिका आणि संपूर्ण जगासमोर आज असा काळ आहे, जेव्हा सर्व काही वेगाने बदलत आहे. अशी संधी दशकातून एकदाच येते आणि आम्हाला माहीत आहे की, आज आम्ही जो निर्णय घेऊ त्याचा परिणाम येणाऱ्या काळावर दिसून येईल.”
द्विपक्षीय चर्चेसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत अमेरिकेतील प्रसिद्ध म्युझिक बँड पेन मसालाने छय्यां-छय्यां, जश्न-ए-बहारासारख्या बॉलिवूड गाण्यांनी केलं.
मोदींनी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर बायडन यांच्या कॅबिनेटसोबतही भेट घेतली.
नरेंद्र मोदींनी म्हटलं, “तीस वर्षांपूर्वी मी एखाद्या सामान्य भारतीयाप्रमाणेच इथे आलो होतो. तेव्हा मी बाहेरून व्हाईट हाऊस पाहिलं होतं. पण आज मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं भारतीय वंशाच्या लोकांसाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे खुले करण्यात आल्याचं पाहिलंय.”
भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत. या दोन्ही देशांची राज्यघटनाही एकाच शब्दाने सुरू होते- वुई द पीपल.
आताच्या परिस्थितीत दोन्ही देशांना आपल्या विविधतेत असलेल्या एकतेचा अभिमान आहे.
त्यांनी म्हटलं, “कोव्हिडच्या काळात जागतिक व्यवस्था नव्यानं आकाराला येत आहे. या काळात भारत आणि अमेरिकेची मैत्री जागतिक सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टिने पूरक ठरेल. जगाच्या हितासाठी शांतता आणि स्थैर्य़ आवश्यक आहे. त्याच दिशेने काम करण्यासाठी दोन्ही देश एकत्र येऊन काम करण्यासाठी उत्सुक आहेत.”
“आम्ही दोन्ही देशांतील प्रश्नांव्यतिरिक्त जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा करू. ही चर्चा सकारात्मक होईल, असा विश्वास मला आहे.”