मात्र 250 ग्रॅम वजन, जगातील सर्वात लहान मुल जन्माला आला

तसे तर दुनियेत सर्वात लहान व्यक्ती, सर्वात अधिक जगणारा व्यक्ती, असे अनेक किस्से ऐकले असतील परंतू अलीकडेच जगातील सर्वात लहान मुलं जन्माला आलं आहे. 
 
जपानमध्ये जन्म घेतलेल्या या मुलाचे वजन मात्र 268 ग्रॅम होतं आणि हा जगातील सर्वात लहान मुलं असल्याचं समजलं जात आहे. यावर उपचार करून डॉक्टरांनी सिद्ध केले की कमी वजन असलं तरी उपचार देऊन त्याला स्वस्त ठेवता येऊ शकतं.
 
टोक्योच्या कीयो युनिव्हर्सिटी प्रमाणे या मुलाचा जन्म मागील वर्षी ऑगस्टच्या इमरजेंसी सीझरियन सेक्शनद्वारे झाले होते कारण 24 आठवडे गर्भात राहून देखील त्याचं वजन वाढत नव्हतं आणि डॉक्टरांना त्यांच्या जीवाची काळजी लागली होती.
 
मुलाचं वजन 3,238 ग्रॅम झाल्यानंतर त्याला सुट्टी देण्यात आली. असे पहिल्यांदा घडले असे नाही. यापूर्वी 2009 साली जर्मनी येथे 274 ग्रॅमचा नवजात जन्माला आला होता. नंतर 2015 मध्ये जर्मनीमध्येच 252 ग्रॅमच्या मुलीचं जन्म झाला होता.
 
सर्वा लहान नवजाताच्या रजिस्टरी वेबसाइटप्रमाणे जगात 23 प्रीमॅच्योर नवजात असे आहेत, ज्याचं वजन 300 ग्रॅमहून कमी होतं तरी ते आता पूर्णपणे स्वस्थ आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती