तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 15,800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी बुधवारी मदत आणि बचाव कार्यात उणिव असल्याचे मान्य केले. ऑनलाइन टीका होत असताना एर्दोगन यांनी भूकंपाच्या सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांपैकी एकाला भेट दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या कहरामनमारसमध्ये मदतकार्यात अडचणी आल्याची कबुली दिली.