“जी- 20′ मध्ये शी जिनपिंग टाळणार मोदींची भेट

शुक्रवार, 7 जुलै 2017 (09:07 IST)
आज “जी-20′ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्‍यता चीनने फेटाळली आहे. सिक्कीममध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये असलेल्या सध्याच्या तणावाच्या पार्श्‍वभुमीवर या चर्चेसाठी पोषक वातावरण नसल्याचे चीनने म्हटले आहे.
 
उद्या जर्मनीतल्या हॅम्बुर्ग येथे होणाऱ्या मोदी आणि जिनपिंग हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. मात्र या “जी-20′ परिषदेच्या निमित्ताने “ब्रिक्‍स’ देशांच्या नेत्यांची बैठकही होणार आहे आणि या बैठकीला इतर नेत्यांबरोबर मोदी आणि जिनपिंग हे देखील उपस्थित राहणार असल्याचे भारतीय सूत्रांनी सांगितले. या बैठकीच्यावेळी मोदी आणि जिनपिंग यांची किमान भेट होईल.

वेबदुनिया वर वाचा