उझमा असे या भारतीय महिलेला बंदुकीच्या धाकावर पाकिस्तानात पळवून नेण्यात आले. तिने इस्लामाबाद उच्च न्यायालयात पती ताहीर अलीविरोधीत खटला भरल्याने ही बाब प्रकाशझोतात आली. पती ताहिर विरुध्द धमकावणे आणि छळ करणे, असा आरोप तिने केला. तिने न्यायालयातील जबाबात स्थलांतराचे कागदपत्रे पतीने बळजबरीने घेतल्याचे सांगितले आहे, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या पीडित महिलने पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांची भेट घेऊन आपबिती कथन केली. यावेळी तिने भारतात सुरक्षतिपणे पाठविले जात नाही, तोपर्यंत भारतीय उच्च आयुक्तालय सोडणार नाही असे म्हटले आहे.