शाळेने दिला सुसाइड नोट लिहायचा होमवर्क

लंडन- ब्रिटनच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांनी चक्क सुसाइड नोट अर्थात आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी लिहायला लावली. इंग्रजी विषयाचा हा होमवर्क बघून या मुलांच्या पालकांना झीट येणे बाकी होते. हे 60 विद्यार्थी शकसपिअरचे प्रसिद्ध नाटक मॅकबेथ चा अभ्यास करणार्‍या गटातले होते.
 
या सुसाइड नोट प्रकरणानंतर वाद वाढल्यावर किडबुक येथील थॉमस टेलिस स्कूलने माफी मागितली आहे. ज्या विद्यार्थ्यांना सुसाइड नोट लिहायला सांगितली, त्यापैकी काही विद्यार्थी असेही होते, ज्यांच्या मित्रांनी आत्महत्या केली होती. एका विद्यार्थिनीच्या तीन मित्रांनी आत्महत्या केली आहे.

वेबदुनिया वर वाचा