अबब तब्बल 153 किलोचा समोसा

बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (14:40 IST)

लंडनमध्ये जगातील सर्वात मोठ्या समोशाची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्व लंडनमधील मशिदीत तयार केलेल्या समोशाचं वजन तब्बल 153 किलो असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. मंगळवारी 22 ऑगस्टला सदरचा  समोसा तयार करण्यात आला आहे. समोसा तयार करण्यासाठी 15 तासांचा वेळ लागला. या समोशाचं वजन 337.5 पाऊंड म्हणजेच 153.1 किलो आहे.

लंडनमधील मशिदीतच समोशासाठी कांदा-वाटाणा-बटाट्याचं सारण, मैद्याचं आवरण तयार करण्यात आलं. त्यानंतर तो समोसा तळण्यात आला. भव्य समोशाला त्रिकोणी आकार येणं, हे मोठं आव्हान होतं. यूकेतील संस्थेच्या डझनभर मुस्लिम कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती