Kuwait: मंगाफ शहरातील इमारतीला भीषण आग, 40 भारतीयांचा होरपळून मृत्यु

बुधवार, 12 जून 2024 (16:48 IST)
कुवेतच्या दक्षिणेकडील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या आगीत किमान 41 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.बुधवारी पहाटे 4:30 वाजता लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघराला आग लागली 

आग लागल्याचे समजतातच नागरिकांनी इमारतीतून बाहेर उडी घातली त्यात काहींचा मृत्यू झाला तर काही जणांचा होरपळून मृत्यू झाला तर काहींचा धुरात गुदमरून मृत्यू झाला.  वृत्तानुसार, या दुःखद घटनेत किमान चार भारतीयांचाही मृत्यू झाला आहे.

या इमारतीत मोठ्या प्रमाणात मल्याळी लोक वास्तव्यास असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. मृतांमध्ये दोन तामिळनाडू आणि दोन उत्तरभारतातील आहे. अद्याप अधिकाऱ्यांकडून दुजोरा आलेला नाही. 

कुवेतच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. इमारतीला लागलेल्या आगीत जखमींना वैद्यकीय सेवा पुरवली जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. 

Edited By - Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती