खालिदा जर्रार यांना सहा महिन्यांची शिक्षा

शनिवार, 15 जुलै 2017 (11:13 IST)
पॅलेस्टाईनच्या एक अग्रगण्य राजकारणी आणि हक्‍क प्रचारक खालिदा जर्रार यांना इस्रायली अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे. ही शिक्षा कोणत्याही खटल्याविना सुनावण्यात आलेली आहे या महिन्याच्या सुरुवातीला खालिदा जर्रार यांना इस्रायलच्या मते एका दहशतवादी संघटनेच्या सदस्या असल्यावरून अटक करण्यात आली होती. बहुतांशी बंद असलेल्या पॅलेस्टाईन संसदेच्या त्या खासदार आहेत. त्यांच्यावर सहा महिन्यांच्या प्रशासकीय प्रतिबंध बजावण्यात आल्याची माहिती अद्दामीर या एनजीओने दिली आहे. खालिदा जर्रार या एनजीओच्या प्रमुख होत्या.
 
खालिदा जर्रार यांना सुनावण्यात आलेल्या पुष्टिकरण सुनावणी (कन्फर्मेशन हियरिंग) 17 जुलै रोजी इस्रायल व्याप्त वेस्टर्न बॅंकच्या ओफर लष्करी न्यायालयात करण्यात येणार असल्याची माहितीही अद्दामीरने दिली आहे. जर्रार यांना यपूर्वीही अनेकदा शिक्षा सुनावंण्यात आलेली आहे.
 
पीएफएलपी (पॉप्युलर फ्रंट फॉर लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन) मध्ये असलेल्या सहभागाबद्दल खालिदा जर्रार यांना अटक करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. 14 महिने इस्रायलच्या तुरुंगात काढल्यानंतर जून 2016 मध्ये खालिदा जर्रार यांना मुक्त करण्यात्‌ आले होते. इस्रायलच्या वादग्रस्त प्रशासकीय प्रतिबंध धोरणानुसार कोणत्याही खटल्याविना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवता येते. नंतऱ्‌ ही शिक्षा अमर्याद काळापर्यंत वाढविता येते. संशयितांविरुद्ध पुरावा जमा करण्याच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

वेबदुनिया वर वाचा