इस्रायल-इराण युद्धामुळे भारतावर येणार संकट

सोमवार, 15 एप्रिल 2024 (14:35 IST)
एक नवीन युद्धाचे संकट जगासमोर येऊन उभे राहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर अजूनही तोडगा निघाला नसून आता नवीन संकट जगासोमर येऊन उभे राहिले आहे.  इराणच्या दूतावासावर  काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणनं इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर आज सकाळी आकाशातून हवाई हल्ला केला. एकच खळबळ उडाली, इराणने टाकलेले ड्रोन व क्षेपणास्त्रे हे इस्रायलच्या काही भागांमध्ये कोसळलीत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरून इराणच्या हल्ल्याचा निषेध केला जात असून तरी हा हल्ला आक्रमक करण्याचा इशारा इराणने दिला आहे. 
 
इस्रायल लष्कराचे प्रवक्ते रेअर अॅडमिरल डॅनिअल हगेरी यांनी दावा केला की, इराणकडून इस्रायलवर ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. इस्रायलच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याच्या आधीच अनेक क्षेपणास्रे उद्ध्वस्त करण्यात आले असे ते म्हणाले. इस्रालयकडून माहिती देण्यात आली हे की, यात १०हून अधिक क्रूज क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. तसेच जागतिक पातळीवर या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. पण इराणने मात्र हे हाले अधिक आक्रमक करू असा संदेश दिला आहे. अधिक भीषण हल्ला करण्याचा उल्लेख इराणनं संयुक्त राष्ट्रांना दिलेल्या लिखित निवेदनातं दिसून आले. तसेच इराणने निवेदनात लिहले आहे की, इराणविरोधात इस्रायलनं जर कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई केली, तर आता त्याला आमचं उत्तर अधिक भीषण आणि संहारक असेल”, असे लिहले आहे.   
 
तसेच, आर्थिक संबंधांवर इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे परिणाम होऊ शकतो. तसेच भारताचा इरांसोबतचा आर्थिक संबंध अधांतरित आहे. इराण व इस्रायल युद्धामुळे महागाईवर परिणाम होऊ शकतो. कारण हे बंदर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या आणि या प्रदेशातील व्यापारी मार्गाचा एक भाग आहे. इस्रायल-इराण या युद्धामुळे महागाई वाढून भारतावर संकट येणाची शक्यता वळवली आत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती