पॅरिसमध्ये अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू, गोळीबारामुळे दोन ठार, चार जखमी; संशयित ताब्यात

शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (19:30 IST)
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केलाय. मध्य पॅरिसमधील भागात ही घटना घडलीय. कुर्डीश सांस्कृतिक केंद्रापासून जवळच हा प्रकार घडला. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये गोळीबार झाला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोळीबार करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे वय 69 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या राजधानीतील स्ट्रीट नंबर 10 जवळ रस्त्यावर गोळीबार करणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की त्यांनी खून, पूर्वनियोजित खून आणि गंभीर हिंसाचाराच्या प्रकरणांचा तपास सुरू केला आहे. सरकारी वकिलांनी सांगितले की, 69 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
पॅरिस पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केल्याचे सांगितले. पॅरिस पोलिसांनी ट्विट करून लोकांना या परिसरापासून दूर राहण्यास सांगितले आहे. आपत्कालीन सेवांनी कामाला गती दिली आहे.
 
सात ते आठ बंदूकीच्या फेरी ऐकल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूकही पोलिसांनी जप्त केलीय. या गोळीबाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या गोळीबाराचा अद्याप उद्देश कळू शकलेला नाही.
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती