मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील जी प्रवीण हा तरुण अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात मृतावस्थेत आढळला. प्रवीणच्या शरीरावर गोळ्या लागल्या आहे, परंतु त्याच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. प्रवीणच्या कुटुंबीयांनी बुधवारी या दुःखद घटनेची माहिती दिली.
प्रवीण मिलवॉकीमध्ये मास्टर ऑफ सायन्स (एमएस) करत होता. बुधवारी सकाळी त्याने त्याच्या वडिलांना फोन केला होता. पण, जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा त्याचे वडील झोपले होते आणि त्यांनी फोन उचलला नाही. नंतर, भारतीय वेळेनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्रवीणच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली.
विद्यार्थी प्रवीणचा मृत्यू कसा झाला?
प्रवीणचे नातेवाईक अरुण म्हणाले की, काही मित्रांनी प्रवीणच्या शरीरावर गोळ्या लागल्याची माहिती दिली. त्यांनी असेही सांगितले की, काही लोकांनी सांगितले की अज्ञात हल्लेखोरांनी एका दुकानात घुसून प्रवीणवर गोळ्या झाडल्या, परंतु हत्येचे कारण काय होते हे स्पष्ट झालेले नाही.