अमेरिकेतील दहा राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असून तापमान उणे 20 अंश सेल्सियसपर्यंत कमी झाले आहे. शिकागो नदी गोठून गेली आहे. हवामान खात्याने तापमान उणे 70अंश सेल्सियस पर्यंत कमी होण्याचा इशारा दिला आहे. इलिनॉय, आयोवा, मिनेसोटा, उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, विस्कॉन्सिन, कन्सास, मिसोरी आणि मोटाना येथे कडाक्याची थंडी आहे. 6 राज्यातील टपाल सेवा बंद करण्यात आलेली आहे.