हाफिज सईद नजरकैदेत!

लाहोर- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड, लश्कर-ए-तोयबा आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. या वृत्ताला पंजाब प्रांताच्या गृहमंत्रालयाने दुजोरा दिल्याचा दावाही काही माध्यमांनी केला आहे.
 
पाकमधील दुनिया न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार हाफिज सईदच्या जमात उद दावा या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली जाणार आहे. पाक सरकार मध्यरात्रीपर्यंत याबाबत घोषण करण्याची शक्यता असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा