प्रियकर कडून धोका मिळाला, प्रेयसी संतापली आणि केले असे काही

सोमवार, 4 डिसेंबर 2023 (21:16 IST)
असं म्हणतात की प्रत्येक नातं विश्वासावर अवलंबवून असत. विश्वास डगमगला की नात्यात दुरावा येतो. सध्या अनेक लोक नात्यात जोडीदाराची फसवणूक करतात. आपली फसवणूक होत आहे किंवा झाली आहे असं समजल्यावर उशीर झालेला असतो. या साठी मोठी किंमत देखील मोजावी लागते. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडीओ मध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराला पकडलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 
 
या व्हिडीओ मध्ये एका महिलेने आपल्या धोक्या देणाऱ्या प्रियकराच्या सामानाला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली फेकले आहे. हे प्रकरण न्यूयार्कचे आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराला एका दुसऱ्या मुलीसोबत बघितले आणि हे बघून ती संतापली आणि तिने जे काही केलं ते बघून प्रियकराला देखील धक्काच बसला.
 
तिने रागाच्या भरात प्रियकराचे कपडे, वस्तू सहाव्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेचा व्हिडीओ एका महिलेने शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओ मध्ये महिला कपडे बाल्कनीतून खाली फेकत आहे. कपडे खाली उभ्या असलेल्या गाड्यावर पडत आहे.
 
ही महिला खूपच संतापली आहे. रागाच्या भरात ही खाली उडी घेत आहे की काय असं वाटत आहे. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत महिलेला रुग्णालयात दाखल केलं. हा व्हिडीओ एका युट्युबवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ करणारी महिला म्हणत आहे की ती आजच न्यूयार्कला पोहोचली आणि तिने हे सर्व बघितले. 
 
Edited by - Priya Dixit
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती