हवामान बदलामुळे प्रभावित होणारी कॅनडाची महिला ही जगातील पहिली रुग्ण असल्याचे म्हटले जाते. या महिलेला श्वसनाचा त्रास होत आहे. उष्णतेची लाट आणि हवेची खराब गुणवत्ता यामुळे रुग्णाची प्रकृती बिघडल्याचे रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही महिला कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील ज्येष्ठ नागरिक असून ती दम्याच्या गंभीर अवस्थेशी झुंज देत आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डॉक्टर काइल मेरिट या महिलेवर कॅनडातील कूटने लेक हॉस्पिटलमध्ये उपचार करत आहेत. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाने कॅनडातील स्थानिक दैनिक द टाइम्स कॉलमिस्टला महिलेची प्रकृती खालावल्याची माहिती दिली. त्यांना मधुमेह व हृदयविकारही आहे. त्या वातानुकूलित नसलेल्या ट्रेलरमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर ऊन आणि उकाड्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्या हायड्रेटेड राहण्यासाठी खरोखरच धडपडत आहे. डॉक्टर मेरिट म्हणतात की, रुग्णांच्या लक्षणांवर उपचार करण्याऐवजी त्याची कारणे ओळखून ती सोडवण्याची गरज आहे.
वृत्तपत्राच्या अहवालात म्हटले आहे की, ब्रिटिश कोलंबियातील लोकांना यावर्षी उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला. पुढील 2-3 महिन्यांत हवेची गुणवत्ता 40 पटीने खराब झाली आहे. कॅनडा आणि अमेरिकेच्या काही भागांमध्ये विक्रमी उष्णतेमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटिश कोलंबियामध्ये उष्माघातामुळे 233 लोकांचा मृत्यू झाला आहे.