अफगाणिस्तानवर तालिबानने काबीज केल्या पासून देशातील महिला आपल्या हक्काबाबत काळजीत आहेत तालिबानने महिलांचे कपडे, शिक्षण आणि कामाबाबत कडक नियम आणि कायदे केले आहेत. आता एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सॅनिटरी नॅपकिनवर बंदी घातली आहे.
सत्य काय आहे ?
जेव्हा आम्ही व्हायरल स्क्रीनशॉट काळजीपूर्वक पाहिले तेव्हा आम्हाला आढळले की त्यात वापरलेला CNN लोगो योग्य नाही. तसेच अनेक शब्दांचे स्पेलिंगही चुकीचे आहे. उदाहरणार्थ, 'sanitary ला sanitoryआणि compliant को complaint असे लिहिले आहे.
यानंतर, आम्ही या बातमीशी संबंधित कीवर्डच्या मदतीने इंटरनेटवर शोध घेतला, परंतु आम्हाला CNN वरच नाही तर इतर कोणताही मीडिया अहवाल सापडला नाही.
वेबदुनियाला त्याच्या तपासात असे आढळून आले की तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सवर बंदी घातल्याचा सोशल मीडियावर केलेला दावा खोटा आहे .वास्तविक, व्हायरल होणारा स्क्रीनशॉट अडिडेट केला आहे. CNN ने अशी कोणतीही बातमी प्रकाशित केलेली नाही.