Earthquake: तैवान 7.2 तीव्रतेच्या भूकंपाने हादरले, त्सुनामीचा इशारा

बुधवार, 3 एप्रिल 2024 (10:14 IST)
तैवानजवळील दक्षिण जपानी बेटाला जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. स्थानिक हवामान खात्याने त्सुनामीचा इशारा दिला आहे. तैवान केंद्रीय हवामान प्रशासनाने सांगितले की, बुधवारी सकाळी तैवानची राजधानी तैपेई येथे 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपामुळे परिसरातील इमारतींचा पायाही हादरला आहे. जपानने म्हटले आहे की त्सुनामीची पहिली लाट त्याच्या दोन दक्षिणेकडील बेटांवर आली आहे.

तैवानमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बुधवार, 3 एप्रिल रोजी राजधानी तैपेईमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. दक्षिण जपान आणि फिलिपाइन्ससाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
तैवानमधील भूकंपात आता किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीय अग्निशमन संस्थेने सांगितले की, हुआलियन काउंटीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला.

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तैवानमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी इंडिया तैपेई असोसिएशनने हेल्पलाइन सुरू केली आहे.तैपेईतील भूकंपानंतर इमारती हादरत होत्या. दरम्यान, जपानच्या हवामान संस्थेने लोकांना सुमारे आठवडाभर अशाच आफ्टरशॉकसाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
 
Edited By- Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती