अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता. मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनीही भूकंपाच्या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. तसेच या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्याही माहितीही त्यांनी दिली आहे. ढिगा-याखाली अनेक लोक दबल्याची भीतीही मॅक्सिकोच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. भूकंपानंतर मॅक्सिको सिटी विमानतळावरून विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं आहे.