डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार

सोमवार, 20 जानेवारी 2025 (10:35 IST)
US News: आज 20 जानेवारी रोजी अमेरिकेत सत्ता परिवर्तन होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आज राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहे.
ALSO READ: नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर स्थगिती, समर्थकांनी केला गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर ते कृतीत दिसतील. व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प लवकरच 100 हून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहे. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीसाठी त्यांच्या टीमने तयार केलेल्या ओव्हल ऑफिस डेस्कवर हे त्यांची वाट पाहत असतील. सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतील. तसेच डोनाल्ड ट्रम्प ज्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहे त्यांचा मुख्य उद्देश निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करणे आहे. एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या पहिल्याच दिवशी विक्रमी संख्येने कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याची त्यांची योजना आहे.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती